Sunday, June 23, 2024

वाती

 

वाती  *****

 

अनंतकाळ तेवून असतात 

काही दिव्यातील वाती 

जशी असतात रुजलेली

मना मनातील नाती 

 

काही वाती  तेलातल्या 

काही साजूक तुपातल्या 

काही तर चक्क असतात 

मेणबत्तीच्या, अत्तरातल्या. 

 

काही असतात उबदार 

काही मात्र चटकेदार

काही मिणमिण करणाऱ्या 

काही लख्ख प्रकाशमान. 

 

काही कधी  जुळलेल्या 

काही कधीच जळलेल्या 

काही विझून जाऊन सुद्धा 

अजून तिथेच थिजलेल्या.  

 

काही आजन्म तेवणाऱ्या

काही लागुन  विझलेल्या

काही प्रयास करून सुद्धा

कधीच न पेटलेल्या.

 

असंख्य विझलेल्या वाती

आयुष्यभर तशाच रहातात.

जवळही त्या करवत नाहीत

दूरही फार लोटवत नाहीत.

 

काही जवळ असून ही 

अनंतात पोचलेल्या 

काही अनंतात जाऊनही 

हृदयात तेवणाऱ्या . 

 

विनय

No comments:

Post a Comment

Boardroom

  Boardroom    ****   Looking at the numbers, down and grim They thought of a plan to bring cheer and grin.   They vowed to plant seeds ...