Sunday, June 23, 2024

दीपस्तंभ


दीपस्तंभ
*****

 

तुझ्या अपेक्षांच गाठोड , मी कधी वाहणार नाही

आशेचा अंकुर तुझा,  कोमेजुन कधी देणार नाही.  ।।१।।

 

गवताच्या काड्या शोधेन, घरट मी बांधणार नाही

तुझ्यासाठी चिमणी बनुन, काडी काडी नेणार नाही  ।।२।।

 

मध होइन फुलातले, पण मधमाशी बनणार नाही

वल्ह होइन नावेचे, नावाडी कधी होणार  नाही.        ।।३।।

 

वात होइन म्हटल नव्हत, तेल कमी पडणार नाही

साथ देईन म्हटल होत, कर्ता कधी होणार नाही.      ।।४।।

 

विनय

 

३ सप्टेंबर २०१७


No comments:

Post a Comment

Boardroom

  Boardroom    ****   Looking at the numbers, down and grim They thought of a plan to bring cheer and grin.   They vowed to plant seeds ...