Sunday, June 23, 2024

नवी पहाट



 

        नवी पहाट 

 

आयुष्याच्या संध्याकाळी 

सकाळ सुद्धा होऊ शकते 

आतून नव्या सूर्याची 

पहाट सुद्धा रंगू शकते. 

 

नवा सूर्य, नवी पालवी 

नवा बहर, नवी सावली 

नवे ज्ञान, नवे विज्ञान 

नवा गंध, नवी माती. 

 

नविन मंथन,नवे अमृत 

देण्यासाठी घ्यावे सारे 

नविन कोवळ्या मनामध्ये  

बीज नविन, रोवत जावे 

 

आठवण या उषेची 

जनीं मनी कोरत जावी  

आयुष्याच्या संध्याकाळी 

पहाटेची गाणी गावी. 

 

- विनय 

ऑक्टोबर २, २०१६

No comments:

Post a Comment

Boardroom

  Boardroom    ****   Looking at the numbers, down and grim They thought of a plan to bring cheer and grin.   They vowed to plant seeds ...