Sunday, June 30, 2024

चिऊताई

 


 चिऊताई  *****

 

"चिऊताई, चिऊताई घेतेस का घरात

ओलाचिंब झालो म्हणून आलो ग दारात".

 

"घरट माझं शेणाचं तुझं छान मेणाचं

पावसामधे गेल वाहून पाण्याच्या झऱ्यात.

चिऊताई, चिऊताई घेतेस का घरात

ओलाचिंब झालो म्हणून आलो ग दारात."

 

"कावळे दादा, कावळे दादा थांब ना जरा

बाळ माझं रडतंय   कशी येऊ मी दारात."

"चिऊताई, चिऊताई घेतेस का घरात

ओलाचिंब झालो म्हणून आलो ग दारात."

 

"थांब माझ्या सोन्याला नाऊ मी घालते

अंग पुसून कोरड करून अंगा मी घालते."

"चिऊताई, चिऊताई घेतेस का घरात

ओलाचिंब झालो म्हणून आलो ग दारात".

 

"थांब माझ्या बाळाला तिट्ट मी लावते

खाऊपिऊ घालते अन घेते मी घरा."

"चिऊताई, चिऊताई घेतेस का घरात

ओला चिंब झालो म्हणून आलो ग दारात".

 

"कावळेदादा कावळेदादा धीर धर ना जरा

बाळ माझं उठू दे मग घेते मी घरा."

"चिऊताई चिऊताई ऐक ना जरा

गोळा करून शेण पुन्हा बांधीन मी घरा.

.............................. पुन्हा बांधीन मी घरा.

.............................. पुन्हा बांधीन मी घरा."

 

विनय


No comments:

Post a Comment

Boardroom

  Boardroom    ****   Looking at the numbers, down and grim They thought of a plan to bring cheer and grin.   They vowed to plant seeds ...