Friday, June 28, 2024

भांडण

 




भांडण

इतर नवरा बायकोच
भांडण किती क्षुल्लक असत
आमचं दोघांचं मात्र
नेहमीच अगदी स्पेशल असतं.
 
सहसा अस होत नाही
की आमचं पटत नाही
पण चुकून जरी झालं तस
मी हट्ट सोडत नाही
 
प्रश्न असतो तत्वाचा,
निष्कर्ष असतो मोलाचा
भांडण असल तसल नसत
एकदम स्पेशल असतं.
 
' कचरेवाली येऊन गेली
ह्यांच आपल लक्षच नसतं
काय माहित कोणत्या तंद्रीत
ह्यांच मन गुंतल असतं? '
 
'गेली तर गेली,  आली तर आली
काय एवढा फरक पडतो?
आईन्स्टाईनचा सिध्दांत  का
त्यामुळे खोटा ठरतो? '
 
मी आपलं बोलून जातो
हिचा पारा वर चढतो.
रागरंग बघून मग 
मी हळूच गोड बोलतो.
 
आमचं दोघांचं भांडण
एकदम स्पेशल असतं
कोणाला ही कधी ते
उघड उघड दिसत नसत.
 
विनय
5 नोव्हेंबर 2023 

Image Credit

Hari gurung77

Creative Commons Attribution-Share Alike 4.0

Love birds jamun khadi jhapa nepal.jpg Copy

[[File:Love birds jamun khadi jhapa nepal.jpg|Love_birds_jamun_khadi_jhapa_nepal]]

https://commons.wikimedia.org/wiki/File:Love_birds_jamun_khadi_jhapa_nepal.jpg 

1 comment:

Boardroom

  Boardroom    ****   Looking at the numbers, down and grim They thought of a plan to bring cheer and grin.   They vowed to plant seeds ...